फेडरेशन कप स्पर्धेचे चुकीच्या वेळी आयोजन

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेचे चुकीच्या वेळी आयोजन करण्यात आले. पुढील वर्षी तरी यात बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत भारतीय फुटबॉल संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी बोचरी टीका केली. त्याच वेळी त्यांनी आता भारतास जागतिक क्रमवारीत ९३ व्या क्रमांकावर नेण्याचे आपले लक्ष्य असल्याचे सांगितले.

फेडरेशन कप स्पर्धेचे आयोजन सदोष होते. पाच दिवसांत तीन लढती आणि त्यातही ४५ अंश तापमानात खेळणे चुकीचेच होते. ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्याची सूचना केली आहे. या वेळी कार्यक्रम अगोदरच निश्‍चित झाल्यामुळे त्यात बदल झाला नाही, असे सांगण्यात आले. आता पुढील वर्षी त्यात बदल होईल, अशी आशा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत मार्गदर्शकांनी जास्तीत जास्त खेळाडूंना संधी द्यायला हवी. त्याबाबत चर्चा करण्याची गरज आहे, असे कॉन्स्टन्टाईन यांनी नमूद केले.

भारतीय वंशाचे चार ते पाच खेळाडू या संघात सहज येऊ शकतील आणि आपली ताकदही खूपच वाढेल. स्पेन, इटली, ब्राझील, जर्मनी या खेळाडूंना घेतात; भारताने घ्यायला काय हरकत आहे? पण याबाबतचा निर्णय माझा नसेल. अर्थात, हा एक तात्पुरता पर्याय असेल. कायमस्वरूपी प्रगतीसाठी भारतीयांनीच चांगली प्रगती करणे आवश्‍यक आहे.
- स्टीफन कॉन्स्टन्टाईन