जागतिक कुस्ती स्पर्धेत फोर कॅमेरा टेक्‍नॉलॉजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - जागतिक कुस्तीतील निर्णय अधिक अचूक होण्यासाठी मॅटभोवतालच्या कॅमेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. पॅरिसला आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत फोर कॅमेरा टेक्‍नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे.

जागतिक स्पर्धा सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना जागतिक कुस्ती महासंघाने याची घोषणा केली. कुस्तीत निर्णय न पटण्याचे प्रसंग वारंवार घडत असतात. त्यामुळे व्हिडीओ पंचांची मदत घेण्यास यापूर्वीच सुरुवात झाली होती. तंत्रज्ञानातील नव्या फोर कॅमेरा टेक्‍नॉलॉजीमुळे प्रत्येक मॅटवरील बहुविध कोनातून लढतीत नेमके काय घडले  याचा फेरआढावा घेता येईल.

निर्णय अधिकाधिक अचूक करण्यासाठीच ही पद्धत अमलात आणली आहे. आपल्याला कोणत्याही चुकीच्या निर्णयाचा फटका बसणार नाही, याची खात्रीच आता सर्वांची होईल, असे जागतिक कुस्तीचे प्रमुख नेनाद लॅल्मोविक यांनी सांगितले. 

भारतीय मल्ल निष्प्रभ
भारताची ग्रीको रोमनच्या आशियाई स्तरावर, तसेच कुमार गटात प्रगती झाली असली तरी भारत वरिष्ठ गटात अजून दूरच असल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. चारही कुस्तीगीर पहिल्याच लढतीत पराभूत झाले. योगेश ७१ किलो गटात जपानच्या ताकेशी झुमीविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत १-३ असा हरला. गुरप्रीतला पात्रता फेरीतच जॉर्जियाच्या मिंदा सुलुकिद्‌झे याच्याविरुद्ध १-५ हार पत्करावी लागली. हंगेरीच्या व्हिक्‍टर लोपिंक्‍झ याने रविंदर खत्रीचा ८५ किलो गटात ८-० धुव्वा उडवला; तर हरदीप ९८ किलो गटात विलियस लॉरीनैतियसविरुद्ध २-५ असा पराजित झाला.