मुंबईकर बंदोपाध्यायची परिपूर्ण कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

श्रीपेरंबुदूर - मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमिओ करंडक स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला. अखेरच्या चौथ्या फेरीत त्याने सरावातील सातत्य कायम राखत पोल पॉझिशन ते चेकर्ड फ्लॅग अशी परिपूर्ण कामगिरी केली. त्याने मोसमातील दुसरा विजय मिळवून गुणतक्‍त्यात दुसरे स्थान गाठले.

मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर सौरवने दोन सराव सत्रांतही वेगवान वेळ नोंदविली होती. चीनच्या आनिंग सन याने दुसरा, तर संदीप कुमारने तिसरा क्रमांक मिळविला. शर्यतीला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या वळणाला आदित्य पवार आणि जीत जाबाख यांच्या कार घासल्या. त्यात जीतच्या कारची कोल्हापूरच्या ध्रुव मोहिते याच्या कारला धडक बसली. त्यामुळे ध्रुवला पीट लेनमध्ये येऊन कारचे नेमके किती तांत्रिक नुकसान झाले आहे, याची चाचपणी करावी लागली. त्यात वेळ गेल्यानंतर त्याने शर्यत पुढे सुरू केली, पण ब्रेकिंगमधील बिघाडामुळे त्याला माघार घ्यावी लागली. परिणामी त्याची गुणांची संधी हुकली. गुणतक्‍त्यात आघाडीवर असलेल्या करमिंदरपाल सिंग याने आठव्या क्रमांकावरून प्रारंभ करताना पाचवे स्थान गाठले होते, पण नंतर तो दोन क्रमांक मागे पडून सातवा आला.

सौरवने सांगितले की, मी या मोसमासाठी कसून तयारी केली. या फेरीपूर्वी मी सिम्युलेटरवर सराव केला. मी कारच्या तांत्रिक डेटाचा अभ्यास करून तंत्रात सुधारणा केली, तसेच शर्यतीचे नियोजन केले. दरम्यान, रविवारी दोन शर्यती होतील.

Web Title: sports news amieo karandak competition