बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ठाकूर यांची न्यायालयाकडे माफी

पीटीआय
शुक्रवार, 14 जुलै 2017

नवी दिल्ली - न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला जाणीवपूर्वक हेतू नव्हता, अशा शब्दांत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.  न्यायालयाला चुकीची माहिती देण्याचा माझा हेतू नव्हता, असा उल्लेख असलेले शपथपत्र ठाकूर यांनी याअगोदरही दिले होते; परंतु न्यायालयाने त्यांना एक पानाचे स्पष्ट उल्लेख असलेले शपथपत्र देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज हा माफीनामा सादर केला.  सर्वोच्च न्यालयाने उद्या (ता. १४) व्यक्तीशः उपस्थित राहून माफीपत्र सादर करायला सांगितले होते; परंतु ठाकूर यांनी ते आजच सादर केले. न्यायालयाने त्याचा स्वीकारही केला.

नवी दिल्ली - न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला जाणीवपूर्वक हेतू नव्हता, अशा शब्दांत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.  न्यायालयाला चुकीची माहिती देण्याचा माझा हेतू नव्हता, असा उल्लेख असलेले शपथपत्र ठाकूर यांनी याअगोदरही दिले होते; परंतु न्यायालयाने त्यांना एक पानाचे स्पष्ट उल्लेख असलेले शपथपत्र देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज हा माफीनामा सादर केला.  सर्वोच्च न्यालयाने उद्या (ता. १४) व्यक्तीशः उपस्थित राहून माफीपत्र सादर करायला सांगितले होते; परंतु ठाकूर यांनी ते आजच सादर केले. न्यायालयाने त्याचा स्वीकारही केला.  न्यायालयाने ठाकूर यांच्यावर न्यायालयाला खोटी माहिती दिल्याबद्दल माफी मागण्यास सांगितले होते.