सिंधूसमोर आव्हान; साईना डार्क हॉर्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई - एका वर्षापूर्वी म्हणजेच रिओ ऑलिंपिक सुरू होण्याच्या सुमारास साईना नेहवालकडे सर्वांचे लक्ष होते; पण डार्क हॉर्स मानल्या जात असलेल्या पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक जिंकले. आता ग्लास्गो येथे सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत सिंधूला पदकाची संधी मानली जात असताना साईना डार्क हॉर्स आहे.

महिला एकेरीच्या स्पर्धेच्या ड्रॉनुसार दुसऱ्या भागात सिंधू सर्वांत ताकदवान आहे; पण तिच्यासमोरील आव्हानही सोपे नाही. जागतिक स्तरावर वेगाने प्रगती करीत असलेल्या कोरियाच्या किम ह्यो मिन हिच्याविरुद्ध दुसऱ्या फेरीतच सिंधूची लढत होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरच्या चेऊन गॅन यी (हाँगकाँग) आणि सुन यी (चीन) याही धोकादायक प्रतिस्पर्धी आहेत. 
रिओनंतर सिंधूचा खेळ जास्त उंचावला आहे. तिने दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्या आहेत. साईनास जागतिक बॅडमिंटन तज्ज्ञच डार्क हॉर्स मानत आहेत. ऑस्ट्रेलियात तिने या स्पर्धेत द्वितीय मानांकन असलेल्या सुंग जी ह्यून हिला हरवले होते. तिने सलग चार सुपर सीरिज स्पर्धांत उपांत्य फेरी गाठली आहे. 

श्रीकांत, साईप्रणितकडून अाशा
साईप्रणित, श्रीकांतची चर्चा आघाडीने होत आहे. प्रणित उपांत्य फेरी गाठू शकेल, असेही मानले जात आहे. सिंगापूर विजेतेपदाने त्याने क्षमतेस अखेर न्याय दिला आहे. त्याची तंदुरुस्ती उंचावल्याने तो जास्त धोकादायक मानला जात आहे. मार्टिन फ्रॉस्ट मात्र श्रीकांतला जास्त पसंती देत आहेत. तिसऱ्या फेरीपासून त्याचा कस लागेल.

Web Title: sports news badminton competition