बोल्ट युगाचा दुर्दैवी अस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

लंडन - उसेन बोल्ट...! वेगाचे जणू दुसरे नाव. भन्नाट वेगाने धावणाऱ्या जमैकाच्या उसेन बोल्ट याने आपल्या ट्रॅकवरील कामगिरीने एकवेळ वाऱ्यालाही लाजवले. ॲथलेटिक्‍स क्रीडा प्रकारातील ‘स्प्रिंट’ प्रकार म्हणजे बोल्ट असे जणू समीकरणच होऊन बसले होते. पण, सोळाव्या जागतिक मैदानी स्पर्धेत नशिबाच्या मनात काही वेगळेच होते. आवडत्या शंभर मीटर शर्यतीत बोल्टला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता अखेरच्या रिले शर्यतीत तो सुवर्णपदक पटकावणार या आशेने सर्वांच्या नजरा रविवारी पहाटे ट्रॅकवरील पाचव्या लेनवर खिळल्या होत्या. शर्यत सुरू झाली. अखेरच्या लेगमध्ये बोल्ट धावू लागला आणि अचानक तो पडला.

लंडन - उसेन बोल्ट...! वेगाचे जणू दुसरे नाव. भन्नाट वेगाने धावणाऱ्या जमैकाच्या उसेन बोल्ट याने आपल्या ट्रॅकवरील कामगिरीने एकवेळ वाऱ्यालाही लाजवले. ॲथलेटिक्‍स क्रीडा प्रकारातील ‘स्प्रिंट’ प्रकार म्हणजे बोल्ट असे जणू समीकरणच होऊन बसले होते. पण, सोळाव्या जागतिक मैदानी स्पर्धेत नशिबाच्या मनात काही वेगळेच होते. आवडत्या शंभर मीटर शर्यतीत बोल्टला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता अखेरच्या रिले शर्यतीत तो सुवर्णपदक पटकावणार या आशेने सर्वांच्या नजरा रविवारी पहाटे ट्रॅकवरील पाचव्या लेनवर खिळल्या होत्या. शर्यत सुरू झाली. अखेरच्या लेगमध्ये बोल्ट धावू लागला आणि अचानक तो पडला. काय झाले ते लगेच कळले नाही. पण, त्याचा चेहरा खूप काही बोलून जात होता. वेदनेने तो व्हिवळत होता. बोल्ट हरला होता. कारकिर्दीमधील अखेरच्या शर्यतीत तो पदकापासून दूर राहिला. 

गेले वर्षभर दुखापतींचा सामना करून अखेरच्या शर्यतीसाठी धावण्यास सज्ज झालेल्या बोल्टच्या  दुखापतीने ऐनवेळी अशा पद्धतीने डोके वर काढावे हे खरंच दुर्दैवी होते. मांडीचा स्नायू खेचला गेल्याने बोल्ट ट्रॅकवर कोसळला. ट्रॅकवर पडूनच खिन्नपणे शर्यत संपताना बघण्यावाचून त्याच्या हाती काहीच नव्हते. चाहत्यांचे डोळेही पाणावले. यजमान ब्रिटनने प्रथमच सुवर्णपदक जिंकले होते. ते बेभान झाले होते. पण, त्यांच्या जल्लोषाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. बोल्टचे काय झाले, असाच प्रश्‍न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 

कारकिर्दीतील शेवटची शर्यत धावण्यासाठी ट्रॅकवर उतरलेला बोल्ट प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन करीत होता. अनेकांचे हात जोडून आभार मानत होता. प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन करीत होता. बोल्टला लगेच वैद्यकीय मदत देण्यात आली. त्याला नेण्यासाटी व्हिलचेअरदेखील आणण्यात आली.

पण, बोल्टने ती नाकारत सहकाऱ्यांचा आधार घेतच ट्रॅक आणि उपस्थित चाहत्यांचा निरोप घेतला. महिलांची उंच उडी व पुरुष पाच हजार मीटर शर्यतीच्या पुरस्कार सोहळ्यामुळे रिले शर्यत दहा मिनिटे उशिराने सुरू झाली. याचा फटका बोल्टच्या दुखापतीस कारणीभूत ठरला, अशी टीका नंतर ब्लेकने केली. प्राथमिक फेरीत धावलेल्या संघात दोन बदल करताना ब्लेक आणि ११० हर्डल्सचा विजेता ओमर मॅक्‍लोडला संधी दिली. मॅक्‍लोडला तर अश्रू आवरणे कठीण गेले. 

बोल्ट ज्यावेळी ट्रॅकवर कोसळला त्यावेळी अमेरिकेचा ख्रिस्तीयन कोलमन आघाडीवर होता. मात्र, ब्रिटनच्या नॅथनील मिचेल ब्लेकने अंतिम क्षणी बाजी (३७.४७ सें.) मारली आणि अमेरिकेला (३७.५२ सें.) २००७ नंतर पुन्हा एकदा सुवर्णपदकापासून वंचित ठेवले. जपान संघाने ब्राँझपदक (३८.०४ सें) मिळविले.

रिले शर्यतीत आतापर्यंत दोन रौप्य, पाच ब्राँझपदके जिंकणाऱ्या ब्रिटनच्या पुरुष संघाला प्रथमच सुवर्ण.
गेल्या चार स्पर्धांत जमैका संघ विजयी होता. 

बोल्ट जागतिक स्पर्धेत 
हेलसिंकी (२००५) - २०० मी. (८वा), 
ओसाका (२००७) - २००मी., ४-१०० रिले (रौप्य)
बर्लीन (२००९) - १००, २००, ४-१०० मी. (सुवर्ण)
डेगू (२०११) - १०० (फाऊल स्टार्ट), २००, ४-१०० रिले (सुवर्ण)
मॉस्को (२०१३) - १००, २००, ४-१०० रिले (सुवर्ण)
बीजिंग (२०१५) - १००, २००, ४-१०० रिले (सुवर्ण)
लंडन (२०१७) - १०० (ब्राँझ).

Web Title: sports news Bolt era's unfortunate stance