बॉक्‍सर विजेंदर ‘डबल चॅंपियन’

पीटीआय
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मुंबई - भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्‍सर विजेंदर सिंगने चीनच्या झुल्पिकर मैमैतिआलीचा चुरशीच्या लढतीत ९६-९६, ९५-९४, ९५-९४ असा पराभव करून दुहेरी चॅंपियनचा बहुमान मिळवला. आशिया पॅसेपिकचा तो विजेता होताच. आज त्याने प्रतिष्ठेचा ओरिएंटल सुपर मिडलवेटचेही अजिंक्‍यपद मिळवले.

वरळीच्या एनएससीआय संकुलात झालेल्या या लढतीकडे भारत वि. चीन असेही पाहिले जात होते. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यासह रामदेवबाबाही विजेंदरला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. विजेंदर आणि झुल्पिकर हे दोघेही अपराजित होते. त्यामुळे लढत चुरशीची होणार हे अपेक्षित होते. प्रत्येकी तीन मिनिटांच्या दहा फेऱ्यांमध्ये विजेंदरने सावध सुरवात केली होती. मध्यावर तो काहीसा पिछाडीवर पडला; परंतु अखेरच्या फेरीत त्याने जबरदस्त पंच देत झुल्पिकरवर मात केली.

भारत-चीन शांततेचे आवाहन
विजेंदरने या लढतीपूर्वी शब्दयुद्ध छेडले होते. चिनी माल जास्त टिकत नाही, असे तो म्हणाला होता. लढतीनंतर मात्र त्याने मैमैतियाली याने अनपेक्षित प्रतिकार केला तसेच त्याची झुंज कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्याचवेळी सीमेवरील तणावासंदर्भात त्याने भारत-चीन शांततेचे आवाहनही केले.

टॅग्स