जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेत अमित उपांत्यपूर्व फेरीत

पीटीआय
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

हॅम्बुर्ग - भारताच्या अमित फांगल याने जागतिक अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याने इक्वेडोरच्या सातव्या मानांकित कार्लोस क्विपो याचा पराभव केला. स्पर्धेतील लाईट फ्लायवेटच्या ४९ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या २१ वर्षीय अमितने सुरेख पदलालित्य राखून क्विपोला जेरीस आणले. जागतिक क्रमवारीत वरचे मानांकन असणाऱ्या क्विपोने अनुभवाच्या जोरावर जोरदार सुरवात केली होती. मात्र, अमितने जोरदार प्रतिआक्रमण करून त्याला निष्प्रभ केले.

हॅम्बुर्ग - भारताच्या अमित फांगल याने जागतिक अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याने इक्वेडोरच्या सातव्या मानांकित कार्लोस क्विपो याचा पराभव केला. स्पर्धेतील लाईट फ्लायवेटच्या ४९ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या २१ वर्षीय अमितने सुरेख पदलालित्य राखून क्विपोला जेरीस आणले. जागतिक क्रमवारीत वरचे मानांकन असणाऱ्या क्विपोने अनुभवाच्या जोरावर जोरदार सुरवात केली होती. मात्र, अमितने जोरदार प्रतिआक्रमण करून त्याला निष्प्रभ केले. यामुळे अनुभवी क्विपो दडपणाखाली आली आणि त्याच्याकडून चुका होऊ लागल्या. पंचांनी त्याला चेहरा वर करण्यासाठी अनेकदा ताकीदही दिली. अमितने पदलालित्य सुरेख ठेवून क्विपोवर सरळ दिशेने मारलेले ठोसे निर्णायक ठरत होते. क्विपो पूर्ण लढतीत क्वचितच मानांकित खेळाडूसारखा खेळला. पूर्ण वर्चस्व अमितनेच राखले होते.