सहाशे मीटरमध्ये शर्यतीत कॅस्टर सेमेन्याचा विश्‍वविक्रम

पीटीआय
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

बर्लिन - जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत आपल्या नेहमीच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्या हिने मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने केली. जागतिक स्पर्धेनंतर विवाहबद्ध झालेल्या २६वर्षीय सेमेन्याने जर्मनीत बर्लिन येथे झालेल्या स्पर्धेत ६०० मीटर शर्यतीत १ मिनीट २१.७७ सेकंद अशी विश्‍वविक्रमी वेळ दिली. तिने १९९७ मध्ये क्‍युबाच्या ॲना फिडेलिया क्वीरॉट हिचा विक्रम शतांश ८६ सेकंदाने मोडला. सेमेन्याने जर्मनीत मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘आठ वर्षांपूर्वी येथेच मी आठशे मीटर शर्यतीत पहिले जागतिक सुवर्णपदक मिळविले होते.

बर्लिन - जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत आपल्या नेहमीच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्या हिने मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने केली. जागतिक स्पर्धेनंतर विवाहबद्ध झालेल्या २६वर्षीय सेमेन्याने जर्मनीत बर्लिन येथे झालेल्या स्पर्धेत ६०० मीटर शर्यतीत १ मिनीट २१.७७ सेकंद अशी विश्‍वविक्रमी वेळ दिली. तिने १९९७ मध्ये क्‍युबाच्या ॲना फिडेलिया क्वीरॉट हिचा विक्रम शतांश ८६ सेकंदाने मोडला. सेमेन्याने जर्मनीत मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘आठ वर्षांपूर्वी येथेच मी आठशे मीटर शर्यतीत पहिले जागतिक सुवर्णपदक मिळविले होते. त्याच मैदानावर आज यंदाच्या मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे.’’ या शर्यतीत तिने अमेरिकेच्या एजी विल्सन हिला शतांश ६२; तर बुरुंडीच्या फ्रान्सिन नियोन्साबा हिला १ मिनीट ४१ सेकंदांनी मागे टाकले.

टॅग्स