बुद्धिबळात भारताला तुर्कस्तानने रोखले 

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

खॅंटी-मॅन्स्यिस्क (रशिया) : भारताला जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेच्या पुरुष विभागात तुर्कस्तानने 2-2 असे बरोबरीत रोखले. महिलांचा रशियाकडून 1-3 असा पराभव झाला.

सहाव्या फेरीअखेर पुरुष संघ 13.5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. महिला संघ दोन क्रमांक घसरून पाचव्या स्थानावर आहे. त्यांचे 12.5 गुण आहेत.

पुढील फेरीत पुरुषांची युक्रेन, तर महिलांची चीनशी लढत होईल. महिलांमध्ये डी. हरिकाने अलेक्‍झांड्रा कॉस्टेनीयूकशी, तर इशा करवडेने कॅटरिना लॅग्नोशी बरोबरी साधली. पद्मिनी रोऊतला व्हॅलेंटिना ग्युनीना, तर एस. विजयालक्ष्मीला ओल्गा गिर्याने हरवले.

पुरुषांमध्ये विदीत गुजराथीने सोलॅक ड्रॅगनशी बरोबरी साधली. परिमार्जन नेगी यानेही मुहम्मद बातुहान दास्तानसह एक गुण वाटून घेतला. दुसऱ्या पटावर बी. अधीबनचा मुस्तफा यिल्माझकडून पराभव झाला, तर के. शशिकिरणने इम्रे कॅनला हरविले.