६० मीटर, ६.३४ सेकंदांत

६० मीटर, ६.३४ सेकंदांत

ख्रिस्तियन कोलमनचा इनडोअर स्पर्धेत जागतिक विक्रम
लॉस एंजलिस - वेगाचा बादशाह उसेन बोल्ट याच्या निवृत्तीनंतर ज्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत, अशा अमेरिकेच्या ख्रिस्तियन कोलमन याने अमेरिकेच्या इनडोअर राष्ट्रीय स्पर्धेत ६० मीटर धावण्याच्या शर्यतीत थेट विश्‍वविक्रमाला गवसणी घातली.

वेगाशी स्पर्धा करणारा नवा धावपटू म्हणून कोलमनकडे बघितले जाते. त्याने आपल्यावरील विश्‍वास सार्थ ठरवताना रविवारी राष्ट्रीय इनडोअर स्पर्धेत ६० मीटर शर्यत ६.३४ सेकंद अशा विश्‍वविक्रमी वेळेत जिंकली. एकवीस वर्षीय कोलमने भन्नाट सुरवात केल्यावर रोनी बेकरला (६.४० सेकंद) ०.१४९ सेकंदाच्या फरकाने मागे टाकले. त्याने मॉरिस ग्रीनच्या विक्रम शतांश ५ सेकंदाने मोडीत काढला. ग्रीनने १९९८ मध्ये माद्रिद येथे ६.३९ सेकंद अशी वेळ दिली होती. 

कोलमन गेल्यावर्षी जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीमधील रौप्यपदक विजेता खेळाडू आहे. कोलमनने याने १९ जानेवारीसच दक्षिण कॅरोलिना येथील एका स्पर्धेत ६.३७ सेकंद वेळ देताना ग्रीनचा विक्रम मोडला होता. मात्र, त्या स्पर्धेत शर्यत सुरवात करताना इलेक्‍ट्रॉनिक ब्लॉक्‍सचा वापर केला नव्हता. त्यामुळे त्याची वेळ ग्राह्य धरण्यात आली नव्हती. कोलमनने २०१७ मध्ये १०० मीटर शर्यतीत ९.८२ सेकंद वेळ दिली होती. पण, जागतिक स्पर्धेत त्याला जस्टिन गॅटलिनने मागे टाकले. पण, कोलमनने बोल्टला मागे टाकत रौप्यपदक पटकावले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com