उद्‌घाटन सोहळ्यावर पावसाचे सावट

Rain-Environment
Rain-Environment

गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील पडदा उद्या उघडला जाईल. स्पर्धेसाठी आलेल्या हजारोहूनही अधिक खेळाडू, ऑफिशियल आणि चाहत्यांच्या स्वागतासाठी उद्या येथील कॅर्रारा मुख्य स्टेडिअमवर शानदार उद्‌घाटन सोहळा रंगणार आहे. संयोजकांनी सोहळ्याची जोरदार तयारी केली असली, तरी हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवल्याने संयोजकांची चिंता वाढली आहे.  

राष्ट्रकुल स्पर्धेचे उद्‌घाटन चोवीस तासांवर आले असले, तरी सोहळ्यावर असलेले पावसाचे संकट टळलेले नाही. अर्थात, येथे आलेले चक्रिवादळ क्वीन्सलॅंडमध्येच अडकल्याने गोल्ड कोस्टला थोडाफार दिलासा मिळाला आहे. त्यानंतरही पावसाचे संकट मात्र गेलेले नाही. उद्‌घाटन सोहळा संध्याकाळी होणार असला, तरी हवामान खात्याने पूर्ण दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर पूर्ण आठवडा गोल्ड कोस्टमध्ये पाऊस राहणार असल्याचाही अंदाज आहे. 

सोहळा होणारच
पावसाच्या इशाऱ्यानंतरही संयोजक सोहळा नियोजित वेळेत आणि कार्यक्रमानुसारच पार पडेल, असे सांगून जणू स्वतःची समजूत काढत आहेत. सोहळा कसा असेल याची माहिती गुलदस्त्यात ठेवली असली, तरी चॅनेल नाईनने रंगीत तालमीची झलक दाखवून क्रीडाप्रेमींची उत्कंठा वाढवली आहे. मात्र, उपाययोजना म्हणून दिलेली चित्रफीत बातम्यांमधून दाखवल्यामुळे संयोजन समितीने चॅनेल नाईनसाठी उद्‌घाटन सोहळ्याचे दरवाजे बंद केले आहेत. 

अडचणींचा सामना
 मैदान आच्छादित नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्‍यता
 इनडोअर स्पर्धा प्रकार कमी असल्यामुळे संयोजकांना स्पर्धा पार पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार
 प्रेक्षकांना मैदानात छत्री आणण्याची परवानगी
 पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि स्पर्धांच्या नियमात बसत असल्यासच स्पर्धा प्रकार पुढे ढकलण्याचा विचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com