महिला क्रिकेटपटूचे ६३ चेंडूंतच शतक

महिला क्रिकेटपटूचे ६३ चेंडूंतच शतक

लंडन - न्यूझीलंडची कर्णधार सूझी बेटस्‌ हिने किआ सुपर लीग टी-२० स्पर्धेत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. तिने अवघ्या ६३ चेंडूंत शतक करताना ७२ चेंडूंत ११९ धावांचा तडाखा दिला. सुझीने १५ चौकार; तसेच चार षटकारांची आतषबाजी केली, त्याचबरोबर तिने विकेटस्‌ घेतल्या; तसेच सीमारेषेवर धावत जात सुरेख झेलही घेतला. तिच्या या कामगिरीमुळे तिच्या सदर्न व्हायपर्स संघाने लफबोरो लायटनिंग संघाला ४६ धावांनी सहज पराजित केले. बेटस्‌ला ३९ धावांवर जीवदान लाभले होते. याचा तिने पुरेपूर फायदा घेतला. तिच्या आक्रमकतेमुळे संघाने वीस षटकांत दोन बाद १८० धावा केल्या.  बेटस्‌ने तडाखेबंद सुरवात करताना तीस चेंडूंत ५३ धावा केल्या; त्यामुळे तिच्या संघाने ‘पॉवर प्ले’मध्ये सर्वाधिक ६३ धावा करण्याचा विक्रम केला. तिने मारलेला एक षटकार तर पुरुषांच्या लढतीसाठी असलेल्या सीमारेषेच्याही खूप दूर गेला होता. मात्र तिला महिलांच्या ट्‌वेंटी-२० लढतीतील सर्वाधिक धावांचा विक्रम करता आला नाही. हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग हिचा आहे. तिने तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० लढतीत १२६ धावा केल्या होत्या. ट्‌वेंटी-२० मधील माझे हे पहिलेच शतक आहे. माझ्याकडून क्‍लीन हिटिंग झाले नाही. धावा होत गेल्या तसे सर्व काही मनासारखे होत गेले. आमचा संघ ताकदवान आहे; त्यामुळे फलंदाजी करताना कोणतेही दडपण नसते, असे तिने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com