क्रिकेट प्रक्षेपणावर ‘स्टार’ची मक्‍तेदारी

Star-Sports
Star-Sports

मुंबई - देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार स्पोर्टसने आपली मक्तेदारी दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी आयपीएलचे हक्क १६,३४७.५ कोटींना मिळवणाऱ्या या कंपनीने रिलायन्स जिओ आणि सोनी नेटवर्क यांचे तगडे आव्हान मोडले आणि पुढील पाच वर्षांत देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हक्क ६,१३८.१ कोटींना मिळवले आहेत.

देशांतर्गत सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क वितरणासाठी बीसीसीआयने प्रथमच ई-लिलाव पद्धतीचा अवलंब केला होता. यामध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचा समावेश आहे. 

क्रिकेटविश्‍वातील सर्वांत श्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डिजिटल हक्कांसाठी फेसबुक आणि गुगल यांनीही उत्सुकता दाखवली होती; परंतु पहिल्या दिवशी त्यांनी माघार घेतली. अखेर स्टार-सोनी आणि रिलायन्स यांच्यातच स्पर्धा झाली. तब्बल अडीच दिवस हा ‘सामना’ रंगला होता. पुढील पाच वर्षांत भारतात १०२ आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. याअगोदरचे हक्कही स्टारकडे होते.

आयपीएलसाठी - १६,३४७ कोटी
देशातील क्रिकेटसाठी - ६,१३८ कोटी

कोटींची उड्डाणे
    स्टारने २०१२ मध्ये ९६ सामन्यांसाठी ३८५१ कोटी मोजले होते.
    त्या वेळीही सोनीशी स्पर्धा. सोनीने ३७०० कोटीपर्यंत बोली लावली होती.
    पुढील पाच वर्षांत १०२ आंतरराष्ट्रीय सामने.
    एका सामन्यासाठी ६० कोटी १० लाख मोजणार
    आयपीएलसाठी एका सामन्यासाठी मोजत आहेत ५५ कोटी.
    सोनीकडे आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेतील प्रसारणाचे हक्क.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com