मलाही ‘खेलरत्न’ पुरस्कार द्या - दीपा मलिक

पीटीआय
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

गुरगाव - पॅरालिंपिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिलीवहिली भारताची महिला दीपा मलिकने, खेलरत्नसाठी आपला विचार करण्यात आला नाही, ही आपल्यासाठी धक्कादायक घटना आहे, अशी खंत व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करून, तिने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणीही केली आहे.

यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड समितीने रिओमधीलच पॅरालिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता देंवेंद्र झझारिया; तसेच हॉकी कर्णधार सरदार सिंगची या पुरस्कारासाठी शिफारस केली. देशातील हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आपल्याला १२ वर्षांपूर्वीच मिळायला हवा होता, असे मत झझारियाने व्यक्त केले होते.

रिओ पॅरालिंपिक स्पर्धेत झाझरियाने सुवर्णपदक मिळवले, त्यातील ५३ किलो गटातील महिलांच्या गोळाफेकीत दीपा मलिकने रौप्यपदक मिळवले होते. पुरस्कारासाठी आपली शिफारस न झाल्याबद्दल दीपा म्हणाली. या यादीत माझे नाव नव्हते याचा धक्का मला बसला. शिफारस करणाऱ्या निवड समितीने सर्वंकष आढावा घेतला नसावा किंवा त्यांनी दुर्लक्ष केले असावे. मलाही खेलरत्न  मिळावा यासाठी मी स्वतःचे नाव पुढे करत आहे. या मागणीचा विचार करावा. निवड समिती आणि क्रीडा मंत्रालयाकडे मी लेखी मागणी करत आहे.