डेल पोट्रो-रॉजर फेडरर आमने-सामने

पीटीआय
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

न्यूयॉर्क  - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोट्रो आणि तिसऱ्या मानांकित व पाच वेळचा विजेता रॉजर फेडरर आमने-सामने आहेत. पोट्रो हा चिवट प्रतिस्पर्ध्या मानल्या जात असल्याने ही लढत स्पर्धेतील सर्वांत रोमांचक लढत ठरेल अशी अपेक्षा बाळगल्या जात आहे. २००९ च्या अंतिम सामन्यात पोट्रोने फेडररवर मात करून कारकिर्दीतील एकमेव ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळविले होते. 

२४ व्या मानांकित डेल पोट्रोने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना सहाव्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमनीक थिआमचे आव्हान १-६, २-६, ६-१, ७-६, ६-४ असे संपुष्टात आणले. तिसऱ्या मानांकित रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोल्शरिबरचा ६-४, ६-२, ७-५ असा सरळ पराभव केला. फेडररचा हा जर्मन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलग बारावा विजय होय. अव्वल मानांकित रॅफेल नदालनेही अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळविले. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यापुढे १९ वर्षीय रशियाच्या आंद्र रुबलेवचे आव्हान आहे. २००१ मध्ये अँडी रॉडीक उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला होता. हा विक्रम आंद्रेने मोडून काढला. अपेक्षित निकाल लागले तर फेडरर आणि नदाल उपांत्य फेरीतच आमने-सामने येऊ शकतात. 

२०१० व २०१३ मध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या ३१ वर्षीय नदालने चौथ्या फेरीत युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोगलोपोलोववर ६-२, ६-४, ६-१ अशी मात केली. त्याचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रतिस्पर्धी रुबलेवने धक्कादायक निकाल नोंदविताना नवव्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीनला ७-६, ७-५, ६-३ असा धक्का दिला. 

कॅरोलिनापुढे कोकोचे आव्हान
महिला विभागात अव्वल मानांकित कॅरोलिना प्लिसकोवापुढे अमेरिकेच्या कोको वॅंडेवेघेचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत ४१८ व्या स्थानावर असलेल्या इस्टोनियाच्या काई कनेपी हिनेसुद्धा अंतिम आठ खेळाडूंत स्थान निश्‍चित केले. ३२ वर्षी कनेपीने रशियाच्या दारिया कस्तकिनावर ६-४, ६-४ अशी मात केली. २०१० मध्येही तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गेल्यावर्षी उपविजेतेपद मिळविणाऱ्या प्लिसकोवाने ४६ मिनिटांत अमेरिकेच्या जेनीफर ब्रॅंडीचा ६-१, ६-० असा धुव्वा उडविला. कोकोने चौथ्या फेरीच्या लढतीत झेकच्या लुसी सॅफरोव्हावर ६-४, ७-६ अशी मात केली.