भारतीय महिला ‘ब’ गटाच्या उपांत्य फेरीत

मुकुंद धस
शुक्रवार, 28 जुलै 2017

दुबळ्या फिजी संघाचा उडवला सहज धुव्वा
बंगळूर - अपेक्षेप्रमाणे भारताने दुबळ्या फिजीचा ९३-५१ असा धुव्वा उडवून बंगळूर येथील कांतिरवा बंदिस्त क्रीडासंकुलात सुरू असलेल्या फिबा महिला आशिया कप बास्केटबॉल स्पर्धेच्या ‘ब’ गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत आता भारताची गाठ लेबनॉन, तर उझबेकिस्तानची गाठ कझाकस्तानशी पडणार आहे. 

डाव्या बगलेवरून संरक्षित क्षेत्रात प्रवेश करून उडी मारून जम्प शॉट द्वारे  शिरीन लिमयेने भारताचे खाते उघडले. परंतु फिजीच्या कोरोवु ने सुरेख ड्राइव्ह इन करून त्यास प्रत्युत्तर दिले. दोन्ही संघांची ८-८ अशी बरोबरी असताना कर्णधार अनिता ने खेळाची सूत्रे हातात  घेऊन लागोपाठ ७ गुण नोंदवून संघास १५-८ अशी आघाडी मिळवून दिली. विजेत्यांच्या झंझावाती आक्रमणामुळे फिजीच्या खेळाडू दबावाखाली आल्या आणि याचा फायदा घेत भारताने आपले वर्चस्व राखण्यास सुरवात केली. लढतीत उत्तरोत्तर वेगवान खेळ करत भारतीय महिलांनी फिजीच्या खेळाडूंना निष्प्रभ केले. दमछाक झालेल्या फिजीला भारताचा प्रतिकार करणे जमलेच नाही. कर्णधार अनिताच्या सुरेख नेमबाजीस शिरीन आणि जिनाने संरक्षित क्षेत्रातून  केलेल्या बास्केटची साथ लाभली. यजमानांनी विश्रांतीलाच ४२-२३ अशी निर्णायक आघाडी घेतली. उत्तरार्धात  सामना एकतर्फी होत असल्याने यजमानांनी आपल्या राखीव खेळाडूंना मैदानात उतरवले आणि त्यांनी शेवटच्या सत्रात आघाडी कायम राखत संघास विजयी केले. 

‘ब’ विभागातील अन्य लढतीत उझबेकिस्तानने सिंगापूरचा ८४-७९, लेबनॉनने श्रीलंकेचा ८६-३७ असा पराभव केला.