माउंट कूनवर पडले प्रथमच मराठी पाऊल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

पुणे - गिरीप्रेमीने कारगिल भागातील माउंट कूनची मोहीम यशस्वी केली. महाराष्ट्रातील ही पहिलीच यशस्वी मोहीम आहे. विशेष म्हणजे सर्व पाचही सदस्यांनी शिखर सर केले. या शिखराची उंची ७०७७ मीटर आहे. एव्हरेस्टवीर रूपेश खोपडेच्या नेतृत्वाखाली डॉ. सुमीत मांदळे, किरण साळस्तेकर, दिनेश कोतकर आणि युगांक कदम यांनी ही कामगिरी केली. सुरू खोऱ्यातील हे शिखर चढाईसाठी अवघड मानले जाते. त्यातच आठ जुलै रोजी प्रतिकूल हवामानामुळे पहिला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. केवळ ४०० मीटर उंचीवरून गिर्यारोहकांना परतावे लागले. यानंतर १० जुलै रोजी दुसऱ्या प्रयत्नात सर्वांनी यश संपादन केले.

पुणे - गिरीप्रेमीने कारगिल भागातील माउंट कूनची मोहीम यशस्वी केली. महाराष्ट्रातील ही पहिलीच यशस्वी मोहीम आहे. विशेष म्हणजे सर्व पाचही सदस्यांनी शिखर सर केले. या शिखराची उंची ७०७७ मीटर आहे. एव्हरेस्टवीर रूपेश खोपडेच्या नेतृत्वाखाली डॉ. सुमीत मांदळे, किरण साळस्तेकर, दिनेश कोतकर आणि युगांक कदम यांनी ही कामगिरी केली. सुरू खोऱ्यातील हे शिखर चढाईसाठी अवघड मानले जाते. त्यातच आठ जुलै रोजी प्रतिकूल हवामानामुळे पहिला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. केवळ ४०० मीटर उंचीवरून गिर्यारोहकांना परतावे लागले. यानंतर १० जुलै रोजी दुसऱ्या प्रयत्नात सर्वांनी यश संपादन केले. ५४०० मीटरला कॅंप १, ६२०० मीटरला कॅंप २, तर ६४०० मीटरला कॅंप ३ लावण्यात आला. पहिल्या व दुसऱ्या कॅम्पदरम्यान ६०० ते ७०० मीटररुंचीची ६० अंश कोनातील हिमभिंत होती. दोरची, मिंग्मा व कामे या शेर्पांनी साथ दिली. उमेश झिरपे व अविनाश फौजदार यांनी मोहिमेला मार्गदर्शन केले.

क्रीडा

नागपूर - महाराष्ट्राची सुवर्णकन्या संजीवनी जाधव हिला आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा यांच्यात जागतिक स्पर्धा; तसेच कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत मॅरेथॉन अंतिम लढत झाली...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

यंदाचे वर्ष टेनिसपटू रॅफेल नदालसाठी एक यशस्वी वर्ष ठरत आहे. जागतिक क्रमवारीत तो पुन्हा अव्वल स्थानावर आला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017