श्रीकांतची धडाकेबाज आगेकूच

ग्लासगो - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी डेन्मार्कच्या आंद्रेस अँतॉनसेनविरुद्ध शटल परतविताना भारताचा के. श्रीकांत.
ग्लासगो - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी डेन्मार्कच्या आंद्रेस अँतॉनसेनविरुद्ध शटल परतविताना भारताचा के. श्रीकांत.

एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

मुंबई - किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळविताना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील सलग तेरावा विजय मिळविला. श्रीकांतने जागतिक स्पर्धेतील सलग तिसऱ्या लढतीत आपली ताकद दाखवून दिली. 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रीकांतने जागतिक क्रमवारीत १८ वा असलेल्या अँडर्स अँतॉनसेन याला २१-१४, २१-१८ असे हरवताना पुन्हा फारसा घाम गाळला नाही. श्रीकांतने सातत्याने नेटजवळ धडक घेत प्रतिस्पर्ध्यास बेसलाइनवर जाण्यास भाग पाडले. श्रीकांतचा जम बसण्यास काहीसा वेळ लागला. त्यानंतर त्याच्या विजयाबाबत कोणासही शंका नव्हती. 

त्याने पहिल्या गेममध्ये सलग पाच गुण जिंकत ब्रेकला ११-३ आघाडी घेत लढतीची दिशा स्पष्ट केली होती.  श्रीकांतने आवश्‍यकता भासल्यास कोर्टच्या मागे जाण्याची तयारी दाखवली; पण त्या वेळी त्याचे शटलवर चांगले नियंत्रण होते. त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाच्या गतीत बदल करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी फसव्या रॅलीजही केल्या; पण श्रीकांतवर याचा फारसा परिणाम झाला नाही. श्रीकांतने त्याला अनुकूल असाच खेळ करण्यास प्रतिस्पर्ध्यास भाग पाडले. 

मिश्र दुहेरीत अपयश
भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीला पराभवचा सामना करावा लागला. त्यांनी सातव्या मानांकित प्रविण प्रविण जॉर्डन आणि डेबी सुसांतो जोडीला जोरदार झुंज दिली. जॉर्डन-सुसांतो जोडीने २०-२२, २१-१८, २१-१८ अशी जिंकली.

साई प्रणीतचा पराभव
विजेतेपदाच्या शर्यतीत डार्क हॉर्स समजल्या जात असलेल्या साईप्रणीतला चिओ तेन चेनविरुद्ध हार पत्करावी लागली. प्रणीत २१-१९, १०-२१, १२-२१ असा पराजित झाला. पहिला गेम प्रणीतने जिंकल्यावर चेनने एकतर्फी हुकूमत राखली. चेन लाँगने अजय जयरामचा २१-११, २१-१० असा फडशा पाडला. साईनाने सुंग जी ह्युनचा २१-१९,२१-१५ असा पराभव केला.

अपेक्षेप्रमाणे खेळ झाल्याचे समाधान आहे. पहिल्या गेमच्या तुलनेत दुसऱ्या गेममध्ये आव्हान जास्त खडतर झाले, हे खरे आहे. या स्पर्धेतील तीनही लढतीत चांगली सुरवात झाली आणि तीच कायम राहिली.
- किदांबी श्रीकांत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com