जागतिक कॅडेट कुस्तीत अंशूनेही जिंकले सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

मुंबई - जपानच्या महिला कुस्तीगीरांना हरवणे या जन्मात शक्‍य नाही, हे ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या साक्षी मलिकचे वक्तव्य नवोदित कुस्तीगीर अंशूने खोटे ठरविले. तिने जपानच्या स्पर्धकास हरवून जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

अथेन्सला सुरू असलेल्या या स्पर्धेत अंशूने ६० किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश करीत सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या होत्या. तिने गतस्पर्धेत ब्राँझ जिंकले होते; पण तिची लढत जपानच्या नाओमी रुईकेविरुद्ध होती. अंशूने पहिल्याच फेरीत गुण घेतला आणि त्यानंतर वर्चस्व कधीही गमावले नाही. तिने हुशारीने निर्णायक लढतीत २-० असा विजय मिळविला. 

अंशूची सुरवातच जबरदस्त होती. तिने पहिल्याच फेरीत रुमानियाच्या अमिना रोक्‍साना हिला तीस सेकंदातच चीतपट केले. त्यानंतर तिने रशियाच्या ॲनास्तासला पारोखिना हिला ६-३; तर उपांत्य फेरीत हंगेरीच्या एरिका बॉगनर हिला ८-० असे पराजित केले होते. 

सिमरन, मनीषा आणि मीनाक्षी यांनी ब्राँझ जिंकले. सिमरनने अमेरिकेच्या कॅटलीन ॲन वॉकर हिला तीन मिनिटांतच १०-० असे हरवत ब्राँझपदक जिंकले. गतविजेत्या मनीषाचे सुवर्णपदक हुकले; पण तिने ४६ किलो गटात ब्राँझ जिंकले. तिने या महत्त्वाच्या लढतीत स्पेनच्या ॲना मारिया टॉरेस हिला ३-२ असे नमवले. मीनाक्षीने मारियाना ड्रॅगुतान हिला ६-२ असे हरवून ५२ किलो गटातील ब्राँझपदक पटकावले. करुणाला मात्र ७० किलो गटात ब्राँझपदकाच्या लढतीत पोलंडच्या व्हिक्‍टोरिया चोलुजविरुद्ध हार पत्करावी लागली.