तब्बल १३ वर्षांनी दुहेरी जेतेपदाचा योग

पीटीआय
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

मुंबई - भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ एकाच वेळी आशिया विजेता असणे हा योग १३ वर्षांनी साधला गेला आहे. यापूर्वी हे २००४ मध्ये असे घडले होते; तर आता महिला संघाच्या यशामुळेच हे १३ वर्षांनी घडले आहे.  जपानमध्ये रविवारी झालेल्या लढतीत् भारतीय महिलांनी चीनचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असे परतवून लावले. 

भारतीय पुरुष हॉकी संघाने २००३ मध्ये क्वालालंपूर आशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एका वर्षाने भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदा आशिया कप जिंकला, त्या वेळी पुरुष विजेतेपद भारताकडेच होते. आता १३ वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघ जिंकला. त्यापूर्वी केवळ १५ दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाने ढाक्‍यात आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.

भारतीय महिलांनी यापूर्वी २००४ मध्ये भारतातच झालेल्या स्पर्धेत जपानचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. २००९ मध्ये विजेतेपदाच्या लढतीत चीनकडूनच झालेल्या पराभवाचा परतफेड या विजयाने केली.  १९९९ मध्ये देखील त्या उपविजेत्या राहिल्या होत्या.