भारताचा स्क्वॅशपटू हरिंदरपाल संधू ऑस्ट्रेलियन ओपन स्क्वॅश विजेता

पीटीआय
रविवार, 9 जुलै 2017

ॲडलेड (ऑस्ट्रेलिया) - भारताच्या हरिंदरपाल संधूने साउथ ऑस्ट्रेलियन ओपन स्क्वॅश स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्याने अंतिम सामन्यात ऱ्हीस डाउलिंगवर ११-८, १२-१०, ११-४ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये तो १-७ असा मागे होता. या तसेच दुसऱ्या गेममध्ये त्याने झुंजार खेळ केला. तिसरा गेम त्याने एकतर्फी ठरविला.

२८ वर्षांचा हरिंदर चंडीगडचा रहिवासी आहे. उपांत्य फेरीत त्याने अग्रमानांकित नेदरलॅंड्‌सच्या पिएड्रो श्‍वीर्टमानला ११-९, १४-१२, ७-११, ११-९ असा धक्का दिला होता. हरिंदरने सांगितले की, ‘हवामान फार थंड होते. येथे ‘पीएसए’ मालिकेतील पहिली स्पर्धा जिंकल्याचा आनंद वाटतो.’ त्याचे हे कारकिर्दीतील आठवे ‘पीएसए’ विजेतेपद आहे. यंदा त्याने तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली. मे महिन्यात मलेशियामध्ये त्याने दोन स्पर्धा जिंकल्या होत्या. एप्रिलमध्ये त्याने आशियाई वैयक्तिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. अंतिम सामना ४० मिनिटे चालला. हरिंदरचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. याआधी त्याने फिलिपीन्समध्ये मकाटी ओपन आणि मलेशियात क्वालालंपूरमधील स्पर्धा जिंकली होती.