भारताच्या महिलांचा सुवर्णपदकाचा चौकार

भारताच्या महिलांचा सुवर्णपदकाचा चौकार

गुवाहाटी - भारताच्या चार महिला बॉक्‍सिंग खेळाडूंनी रविवारी महिला युवा जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण पंच’ दिला. नीतू (४८ किलो), ज्योती गुलिया (५१ किलो), साक्षी चौधरी (५४ किलो) आणि शशी चोप्रा (५७ किलो) यांनी सुवर्ण कामगिरी केली. भारताची नेहा यादव (८१ किलोहून अधिक) आणि अनुपमा (८१ किलो) ब्राँझपदकाच्या मानकरी ठरल्या. यापूर्वीच्या स्पर्धेत भारताला केवळ एक ब्राँझपदक मिळाले होते. त्याचबरोबर २०११ मध्ये सूरजबालादेवी हिने मिळविलेल्या सुवर्णपदकानंतर भारताची ही सर्वोत्तम  कामगिरी ठरली.

भारताच्या नीतूने कझाकस्तानच्या झाझरिया उर्काबायेवा हिचा पराभव केला. नीतूच्या अचूक खेळापुढे झाझरिया हिला आपल्या खेळाचा समतोल राखता आला नाही. ज्योतीने रशियाच्या एकटेरिना मॉलचानोवा हिचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. एकमेकींवर हल्ला- प्रतिहल्ला करत दोघींनी लढतीमधील चुरस वाढवली होती. रशियन खेळाडूस प्रेक्षकांचाही पाठिंबा अधिक मिळत होता. मात्र, भारताच्या ज्योतीने कमालीच्या संयमाने प्रतिआक्रमण करत तिचे हल्ले परतवून लावले आणि  पंचांकडून विजयाचा कौल मिळविला. त्या वेळी रशियन प्रतिस्पर्धीस रडू कोसळले. 

साक्षी आणि इंग्लंडची इवी जेनी स्मिथ यांच्यातही अशीच चुरस झाली. दोघींच्या खेळात सातत्य होते; पण आक्रमणात सरस ठरलेल्या साक्षीने पंचांकडून ३-२ असा कौल मिळविला. शशीला मात्र प्रतिकार झाला नाही. तिने व्हिएतनामच्या जॉक डो होंग हिचा सहज पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com