जॉयसिलीनचा विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

प्रागमध्ये (चेक प्रजासत्ताक) केनियाच्या जॉयसीलीन जेपकोस्गेई हिची बिरेल ग्रांप्री रोड रेसमध्ये दहा कि.मी. शर्यतीत विश्‍वविक्रमी वेळ.
ही शर्यत ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारी पहिलीच महिला धावपटू
२३ वर्षांच्या जॉयसिलीनची वेळ २९ मिनिटे ४३ सेकंद. फॅन्सी चेमुताई (३०.०६) दुसरी, तर व्हिओलाह जेपचुम्बा (३०.२५) तिसरी
यापूर्वीचा ३० मिनिटे ४ सेकंद वेळेचा उच्चांक याच शहरात तिने प्रागमधील स्पोर्टीसमो अर्धमॅरेथॉनमध्ये एक एप्रिल रोजी नोंदविला होता

जॉयसिलीनचा यंदा तब्बल पाचवा विश्‍वविक्रम. एक एप्रिल रोजी तिने अर्धमॅरेथॉनमध्ये दहा, १५, २० किमी असे तीन टप्पे तसेच अर्धमॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदविली होती
आंतरराष्ट्रीय महासंघ ट्रॅक तसेच रोड रेसचे विक्रम वेगवेगळे नोंदविते
दहा हजार मीटर शर्यतीचा विश्‍वविक्रम २९ मिनिटे १७.४५ सेकंद वेळेचा
हा उच्चांक इथिओपियाच्या अल्माझ अयाना हिने रिओ ऑलिंपिकमध्ये नोंदविला होता
 
मला खूप आनंद झाला आहे. मला विजेती बनविल्याबद्दल तसेच विश्‍वविक्रम घडविल्याबद्दल मी देवाची आभारी आहे.

- जॉयसिलीन जेपकोस्गेई

टॅग्स