किशोर गट कबड्डीत ‘साई’ राष्ट्रीय विजेते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - भारतीय कबड्डी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या किशोर गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) संघाने मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले. ही स्पर्धा झारखंडमध्ये दुमका येथे 
पार पडली. 

मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात ‘साई’ संघाने उत्तर प्रदेशचा २७-१५ असा पराभव केला. मुलींच्या विभागात ‘साई’ने गतविजेत्या हरियानाला धक्का दिला. त्यांनी ३६-१६ असा एकतर्फी विजय मिळविला. मुलांच्या गटातील उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशने मध्य प्रदेशचा (३६-२४), ‘साई’ने तमिळनाडूचा (३६-१६), मुलींच्या विभागात ‘साई’ने बिहारचा (५२-९), हरियानाने छत्तीसगडचा (३०-२१) पराभव केला.