सलग दोन विजयांसह कश्‍यप मुख्य स्पर्धेत

सलग दोन विजयांसह कश्‍यप मुख्य स्पर्धेत

मुंबई/नवी दिल्ली - हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेतील सहभाग व्हिसाच्या प्रश्नामुळे अडचणीत आलेल्या पारुपली कश्‍यपने हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले. यासाठीच्या दोन पात्रता लढती जिंकण्यासाठी त्याला एक तासही लागला नाही.

कश्‍यपने तैवानच्या कान चाओ यु याला २१-१२, २१-१० असे १८ मिनिटात, तर हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊ याला २१-१३, २१-१९ असे ३८ मिनिटात हरवले. कानविरुद्ध त्याने केवळ एकच मॅच पॉईंट दवडला, त्याचबरोबर चांगला सराव करताना सलग सात गुण जिंकले होते, तर लीविरुद्ध दुसऱ्या गेममध्ये एकावेळी गमावलेले सलग सात गुण त्याला सलत असतील.  

दरम्यान, मुंबईकर श्‍लोक रामचंद्रन आणि एमआर अर्जुन पुरुष दुहेरीच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या लढतीत कोरियन जोडीविरुद्ध पराजित झाले, तर राष्ट्रीय सात्विक साईराज रानिकरेड्डी आणि अश्विनी पोनप्पाला  मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीत सलामीलाच हार पत्करावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com