झाझरिया, सरदारच्या ‘खेलरत्न’वर सरकारची मोहोर

पीटीआय
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - निवड समितीने सादर केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया आणि माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग यांच्या ‘खेलरत्न’ पुरस्कारावर सरकारची मोहोर उमटवली.
या मुख्य पुरस्काराबरोबरच क्रीडा मंत्रालयाने ‘अर्जुन’, ‘द्रोणाचार्य’ आणि ‘ध्यानचंद जीवनगौरव’ या अन्य पुरस्कारांनादेखील मान्यता दिली. 

या मध्ये सात प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’, १७ क्रीडापटूंना ‘अर्जुन’, तिघांना ‘ध्यानचंद’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळा राष्ट्रीय क्रीडादिनी ‘२९ ऑगस्ट’ला राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. 

‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी पदक, मानपत्र आणि रोख ७.५ लाख, ‘अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद’ पुरस्कारासाठी ब्राँझचा पुतळा, प्रमाणपत्र आणि रोख पाच लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

पुरस्कार्थींची अंतिम यादी
खेलरत्न - देवेंद्र झाझरिया, सरदार सिंग

द्रोणाचार्य - स्व. डॉ. आर. गांधी (ॲथलेटिक्‍स), हीरा नंद कटारिया (कबड्डी), जी. एस. एस. व्ही. प्रसाद (बॅडमिंटन), ब्रीज भूषण महंती (बॉक्‍सिंग), पी. ए. राफेल (हॉकी), संजॉय चक्रवर्ती (नेमबाजी), रोशन लाल (कुस्ती)

अर्जुन - व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर सिंग, अरोकिया राजीव (दोघे ॲथलेटिक्‍स), प्रशांती सिंग (बास्केटबॉल), लैशराम देवेंद्रो सिंग (बॉक्‍सिंग), चेतेश्‍वर पुजारा, हरमनप्रीत कौर (दोघे क्रिकेट), ओईनाम बेमबेम देवी (फुटबॉल), एस. एस. पी. चौरासिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी), जसवीर सिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश (नेमबाजी), ए. अलमराज (टेबल टेनिस), साकेत मैनेनी (टेनिस), सत्यव्रत काडियन (कुस्ती), मरियाप्पन, वरुण सिंग भाटी (दोघे पॅरालिंपियन)

ध्यानचंद - भूपेंदर सिंग (ॲथलेटिक्‍स), सईद शहिद हकिम (फुटबॉल), सुमराय टेटे (हॉकी)