सुपर सीरिज विजेतेपदाचा श्रीकांतचा चौकार

पीटीआय
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पॅरिस - भारताचा बॅडमिंटनमधील चमकता तारा श्रीकांत किदांबीने सुपर सीरिज विजेतेपदाचा चौकार मारला. आज झालेल्या फ्रेंच ओपन सुपर सीरिजमध्ये त्याने सहज विजेतेपद मिळवले. यंदाच्या वर्षातील हे त्याचे चौथे आणि सलग दुसरे विजेतेपद आहे. गेल्या रविवारी डेन्मार्क सुपर सीरिज जिंकणाऱ्या श्रीकांतने आजच्या अंतिम सामन्यात जपानच्या केंता निशिमोटोचा २१-१४, २१-१३ असा पराभव केला.

सिंगापूर स्पर्धेतही निशिमोटोचा पराभव केलेला असल्यामुळे श्रीकांतचे पारडे निश्‍चितच वरचढ होते; परंतु त्याला जम बसवायला काही वेळ लागला. पहिल्या गेमध्ये तो ५-९ असे पिछाडीवर पडला होता. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. सलग सहा गुण मिळवून ११-९ अशी आघाडी घेतल्यावर आपली ताकद दाखवली. हा पहिला गेम २१-१४ असे खिशात टाकल्यावर विजेतेपद त्याला खुणावू लागले होते. दुसऱ्या गेममध्ये वाढलेल्या आत्मविश्‍वासाच्या जोरावर निशिमोटोला प्रतिकाराचीही संधी दिली नाही.