बॅडमिंटन पारितोषिक रकमेत भारताचा श्रीकांत आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - नवा स्टार किदांबी श्रीकांतने यंदा आतापर्यंत तीन सुपर सीरिज स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. यामुळे त्याने बक्षीस कमाईत अव्वल क्रमांक मिळविला. त्याने तैवानची अव्वल खेळाडू तई झु यिंग हिला मागे टाकले आहे.

श्रीकांतने १ लाख ४७ हजार ८४७.५० डॉलरची कमाई केली आहे, तर जागतिक महिला क्रमवारीत अव्वल असलेल्या यिंगची कमाई १ लाख ३३ हजार १२५ डॉलर आहे. सिंगापूर उपविजेतेपद तसेच इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदामुळे त्याने ही झेप घेतली आहे. केवळ पुरुष क्रमवारी लक्षात घेतल्यास श्रीकांतने दुसऱ्या क्रमांकावरील मलेशियाच्या ली चाँग वेई याच्यापेक्षा दुपटीने कमाई केली आहे. वेईची कमाई ७१ हजार ३०० डॉलर आहे.