किसन पाच हजार मीटरच्या अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नाशिक/पुणे  - भारताच्या किसन तडवीने जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्‍समध्ये  पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत त्याने सहावे स्थान मिळवताना १४ मिनिटे ३५.८३ सेकंद अशी वेळ नोंदवली.

ही स्पर्धा तैपेई सिटी (तैवान) येथे सुरू आहे. किसनची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक वेळ आहे. अंतिम शर्यत २८ तारखेला होईल. पात्र ठरलेल्या १५ स्पर्धकांमध्ये किसन वेळेनुसार शेवटचा आहे. १४ मिनिटे २३.१२ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ इथिओपियाच्या झेमेन अद्दीस अयाल्नेह याने नोंदविली. १४व्या क्रमांकाची १४ः३४.८७ अशी वेळ अमेरिकेच्या ब्रायन बॅर्राझा याने नोंदविली.

दरम्यान, रविवारी नाशिकची संजीवनी जाधव पाच हजार मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत धावणार आहे. संजीवनीने  दहा हजार मीटर गटातून धावताना रौप्यपदकाची कमाई केली. तिने ३३ मिनिटे २२ सेकंद इतक्‍या वेळेची नोंद केली. 

Web Title: sports news kisan tadvi