रंकीरेड्डी - चिरागची प्रभावी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी व चिराग शेट्टीने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सातव्या मानांकित जोडीस हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच धडक मारली. पुरुष दुहेरीतील भारतीय जोडीची ही कामगिरी प्रभावी ठरली.

सत्विक - चिरागने तैवानच्या ली झे हुई - ली यांग यांना २३-२१, १६-२१, २१-८ असे पराभूत केले. भारतीय जोडीने पहिल्याच गेममध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या तोडीस तोड रॅलीज, तसेच आक्रमण करीत सर्वांना धक्का दिला. चिरागने कोर्टच्या पुढील बाजूस राहत केलेले स्मॅश जबरदस्त होते. भारतीयांनी दुसरा गेम गमावला; पण निर्णायक तिसरा गेम सहज जिंकत आगेकूच केली.

उपांत्यपूर्व फेरीची कधीही अपेक्षा बाळगली नव्हती. जागतिक स्पर्धेतील अपयशामुळे फार आशा नव्हत्या. हा आमचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय आहे, असे चिरागने सांगितले. रंकीरेड्डीने मिश्र दुहेरीच्या पात्रता लढती खेळल्याचा फायदा झाल्याचे सांगितले. 

तो म्हणाला, या लढतीमुळे कोर्टचा चांगला अंदाज आला होता. सलामीची लढत तैवानच्या जोडीविरुद्धच होती. तैवानचे खेळाडू जास्त ड्राईव्ह करतात. त्यांनी हेच केले; तर शटल जास्तीत जास्त खाली ठेवत रॅलीवर नियंत्रण ठेवण्याची आमची योजना यशस्वी झाली.