कुमार हॉकी संघाचे फेलिक्‍स मार्गदर्शक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - भारतीय कुमार हॉकी संघाच्या मार्गदर्शकपदी माजी कर्णधार ज्यूड फेलिक्‍स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यशस्वी युरोप दौऱ्यामुळे फेलिक्‍स यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युरोप दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात नऊ कुमार हॉकीपटूंचा समावेश होता. 

या संघाने युरोपात नेदरलॅंडस्‌ तसेच ऑस्ट्रियास हरवले. भारतीय कुमार हॉकीपटू गेल्या काही वर्षांत वेगाने प्रगती करीत आहेत. ते वरिष्ठ संघातील स्थानासाठी आता स्पर्धा करीत आहेत. यासाठी फेलिक्‍स यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. फेलिक्‍स हे खेळाचे कुशल अभ्यासक मानले जातात.

अधुनिक हॉकीशी त्यांनी चांगल्या प्रकारे जुळवून घेतले होते. अर्जुन पुरस्कार विजेत्या फेलिक्‍स यांना अडीचशेहून जास्त आंतरराष्ट्रीय लढतींचा अनुभव आहे.