विजयासह लुईस हॅमिल्टनची आघाडी

पीटीआय
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मोंझा (इटली) - मर्सिडिझ संघाच्या लुईस हॅमिल्टन याने रविवारी इटालियन ग्रांप्री जिंकत फॉर्म्युला वन शर्यतीत सर्वसाधारण विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी घेतली. विक्रमी ६९वी पोल पोझिशन मिळविल्यानंतर हॅमिल्टन याने आज निर्विवाद वर्चस्व राखत विजेतेपद मिळविले. या मोसमातील त्याचे सहावे; तर कारकिर्दीमधील ५९वे विजेतेपद ठरले. त्याने आज संघ सहकारी व्हॅलेटरी बोटासला मागे टाकले. हॅमिल्टनने (२३८) आता विजेतेपदाच्या शर्यतीत सेबॅस्टियन व्हेटलवर (२३५) तीन गुणांची आघाडी घेतली. व्हेटेल आज तिसरा आला. तो ३६ सेकंदांनी मागे पडला.