अमेरिकन ओपनसाठी मारिया शारापोवाला ‘वाईल्ड कार्ड’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

न्यूयॉर्क - आगामी अमेरिकन ओपन या मोसमातील अखेरच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेसाठी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिला ‘वाईल्ड कार्ड’ देण्यात आले आहे. उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे शारापोवावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर पुनरागमन करताना शारापोवाला विविध स्पर्धांच्या संयोजकांनी वाईल्ड कार्ड दिले. जागतिक क्रमवारीत १४८व्या स्थानावर असलेली शारापोवा दोन सराव स्पर्धांत दंडाच्या दुखापतीमुळे भाग घेऊ शकली नाही. त्यामुळे तिला थेट प्रवेशासाठी वाईल्ड कार्डवरच अवलंबून राहावे लागणार होते.

Web Title: sports news Maria Sharapova tennis

टॅग्स