मितालीस तेलंगणचे एक कोटी आणि भूखंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

हैदराबाद  - भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिला तेलंगणा सरकारने एक कोटीचे बक्षीस, तसेच घरासाठी ६०० चौरस यार्डांचा भूखंड देणार असल्याचे जाहीर केले. मिताली विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद जिंकलेल्या भारतीय संघाची कर्णधार आहे. तिने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. तिचे मार्गदर्शक आरएसआर मूर्ती यांनाही २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.