लांबपल्ल्याच्या शर्यतीचा बादशाह  - मो फराह

पीटीआय
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

जेन जमले लॅसी विरेन (फिनलॅंड), केनेनिसा बेकेले, हॅले गॅब्रेसलासी (दोघेही इथिओपीया) यांना ते करून दाखविले ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने. २०११ च्या डेगू जागतिक स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर ३४ वर्षीय मो फराहने त्याच स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि तिथूनच सुरू झाला त्याचा सुवर्णकाळ. जन्माने सोमालियन असलेल्या फराहने २०१३, १५ जागतिक स्पर्धा, २०१२, १६ ऑलिंपिक स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून लांब पल्ल्याच्या शर्यतीतील सर्वकालीन महान धावपटूंत स्थान मिळविले. अशी कामगिरी कोणत्याही लांब पल्ल्याच्या धावपटूला करता आलेली नाही.

जेन जमले लॅसी विरेन (फिनलॅंड), केनेनिसा बेकेले, हॅले गॅब्रेसलासी (दोघेही इथिओपीया) यांना ते करून दाखविले ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने. २०११ च्या डेगू जागतिक स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर ३४ वर्षीय मो फराहने त्याच स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि तिथूनच सुरू झाला त्याचा सुवर्णकाळ. जन्माने सोमालियन असलेल्या फराहने २०१३, १५ जागतिक स्पर्धा, २०१२, १६ ऑलिंपिक स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून लांब पल्ल्याच्या शर्यतीतील सर्वकालीन महान धावपटूंत स्थान मिळविले. अशी कामगिरी कोणत्याही लांब पल्ल्याच्या धावपटूला करता आलेली नाही. स्प्रिंटमध्ये उसेन बोल्ट तर लांब पल्ल्याच्या शर्यतीत मो फराह. बोल्टप्रमाणेच फराहसुद्धा लंडननंतर स्पर्धात्मक ॲथलेटिक्‍सचा निरोप घेणार आहे. फरक इतकाच की फराह जागतिक स्पर्धेनंतर झ्युरीच येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. त्यामुळे लंडन ही त्याची शेवटची जागतिक स्पर्धा राहणार आहे. जिंकल्यानंतर दोन्ही हात डोक्‍यावर घेऊन इंग्रजी एम (यास मोबोट म्हणतात) असे चिन्ह काढणे ही त्याची ओळख झाली आहे. शर्यतीत शेवटची फेरी किंवा शेवटचे काही अंतर अतिशय वेगाने पूर्ण करण्यात फराह वाकबगार मानला जातो. यामुळेच रिओ ऑलिंपिकमध्ये दहा हजार मीटर शर्यतीच्या वेळी दहाव्या फेरीदरम्यान अडखळून पडल्यानंतरही त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. अन्य प्रमुख स्पर्धांप्रमाणे या वेळी दोन्ही शर्यतीत इथिओपीयन, केनिया, युगांडाच्या धावपटूंचे आव्हान फराहला आहे. 

क्रीडा

लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या...

09.12 AM

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीसाठी तयार असलेल्या खेळपट्टीवर गवत आहे. त्याचा फायदा...

07.33 AM

टोकियो : जागतिक अजिंक्‍यपद आणि सिंगापूर सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरीत समोरासमोर आलेल्या भारताची पी. व्ही. सिंधू आणि जपानची...

06.03 AM