सुशीलच्या नियुक्तीस नरसिंगचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नवी दिल्ली - कुस्तीगीर सुशीलकुमार आणि नरसिंग यादव यांच्यामधील छत्तीसचा आकडा अजूनही कायम आहे. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या नरसिंगने या वेळी सुशीलला थेट लक्ष्य करत त्याच्या राष्ट्रीय निरीक्षक बनण्यास आव्हान दिले आहे.

सुशीलची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात परस्पर हितसंबंधाच्या तत्त्वाचा भंग होत असल्याचे नरसिंगने क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सासरे सत्पाल यांच्या छत्रसाल आखाड्यात सुशील नवोदित मल्लांना घडविण्याचे काम करत असताना तो राष्ट्रीय निरीक्षक कसा होऊ शकतो, असा प्रश्‍न त्याने या पत्राद्वारे क्रीडा मंत्रालयाला विचारला. रियो ऑलिंपिकला जाण्यापासून आपल्याला रोखण्यात सुशीलनेच अडथळे निर्माण केल्याचा आरोपही त्याने या पत्रात केला आहे.