कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

पुणे - कुमार गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. ही स्पर्धा कटक येथे सुरू आहे. 

महाराष्ट्राच्या मुलांनी ‘साई’कडून ५६-२३ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. मुलींनी एकवेळ प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, हरियानासमोर त्यांचा निभाव लागला नाही. हरियानाने ३३-२३ असा विजय मिळविला. नियोजनाचा अभाव हेच महाराष्ट्राच्या पराभवाचे कारण ठरले. हरियानाच्या मुलींनी तिसऱ्या चढाईवर खेळण्याचे तंत्र कमालीचे राबवले. महाराष्ट्राच्या बचावपटूंनी अशा वेळी विनाकारण घाई करून गुण गमावले. चढाईत गुण मिळत असतानाही केवळ बचावात झालेल्या चुका महाराष्ट्राला महाग पडल्या.
 महाराष्ट्राच्या मुलींना तीन वेळा हरियानाला लोण देण्याची संधी होती. मात्र, या तीनही वेळी महाराष्ट्राच्या चढाईपटूची ‘सुपर टॅकल’ झाली. मुलांच्या गटातील दुसऱ्या उपांत्य लढतीत उत्तर प्रदेशाने तमिळनाडूचे आव्हान ४१-३७ असे मोडित काढले. मुलींच्या गटातील दुसरी लढत साईने उत्तर प्रदेशाविरुद्ध ३४-१९ अशी जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com