व्हिक्‍टोरिया ओपन स्क्वॅश स्पर्धेत भारताचा हरपालसिंग संधू विजेता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

चेन्नई - भारताचा स्क्वॅश खेळाडू हरपालसिंग संधू याने सलग दुसऱ्या आठवड्यात ऑस्ट्रेलियातील खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर, त्याने शनिवारी व्हिक्‍टोरियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्याच अव्वल मानांकित रेक्‍स हेड्रिक याचा १२-१४, ११-३, ११-४, ११-७ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये झालेला पराभव वगळता हरपालने प्रतिस्पर्ध्याला संधीच दिली नाही. या वर्षी मे महिन्यात मोसमाला मलेशियन स्पर्धेतून सुरवात झाल्यापासून हरपाल सलग १७ सामने जिंकला आहे. त्याने या मोसमात फिलिपाईन्स ओपन स्पर्धाही जिंकली आहे.