वेटलिफ्टिंगमध्ये ओर्मिला देवीला तीन सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - कोनसाम ओर्मिला देवीने आशियाई कुमार व युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. तिने हा पराक्रम युवा गटातील ४४ किलो वजनी गटात केला. ओर्मिलाने स्नॅचमध्ये ५५ किलो, क्‍लीन ॲण्ड जर्कमध्ये ७२ किलो व एकूण १२७ किलो वजन उचलून बाजी मारली. 

वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच, क्‍लीन ॲण्ड जर्क, तसेच एकूण वजन धरून क्रमवारी निश्‍चित होते. या स्पर्धेतील ४८ किलो वजनी गटात दलबेहेरा झिलील तीनही प्रकारांत पाचवी आली. तिने एकंदर १५८ किलो (६९ व ८९) वजन पेलले. थायलंडच्या तीरापात चॉमचेऊन याने युवकांच्या ५० किलो गटात जागतिक विक्रम करताना क्‍लीन ॲण्ड जर्कमध्ये १२७ किलो वजन उचलले.