सिंधूचे प्रयत्न अखेर अपुरेच

सिंधूचे प्रयत्न अखेर अपुरेच

क्वालून/मुंबई - पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ताई झू यिंग हिला चांगली झुंज दिली; पण या वर्षीच्या अखेरच्या सुपर सीरिज स्पर्धेतील अंतिम लढतीत सिंधूला दोन गेममध्येच हार पत्करावी लागली. यिंगने गतवर्षीच्या हाँगमधील निकालाची पुनरावृत्ती करताना दोन गेममध्येच विजय मिळविला.

सलग पाचवी स्पर्धा खेळणारी सिंधू यिंगच्या योजनाबद्ध खेळासमोर टिकू शकली नाही. दुसऱ्या गेममधील माफक आघाडी सोडल्यास सिंधूला क्वचितच लढतीवर हुकूमत मिळवता आली. सिंधूची प्रत्येक चाल जणू ओळखून यिंग खेळत होती. अखेर पाऊण तास चाललेली अंतिम लढत सिंधूने १८-२१, १८-२१ अशी गमावली. गतवर्षी अंतिम फेरीत सिंधू १४-२१, १६-२१ पराजित झाली होती.  त्या तुलनेत सरस कामगिरी केल्याचेच समाधान सिंधूला लाभले. 

या सामन्यात सुरवातीपासून सिंधू यिंगला गाठण्याचाच प्रयत्न करीत होती. ०-३ वरून २-३, २-७ वरून ६-७, ७-१३ वरून १०-१३ अशीच झगडत होती. अखेर तिने १८-१८ बरोबरी साधली. याचवेळी शॉट परतवताना सिंधूची रॅकेटचे स्ट्रिंग खराब झाले. त्याचाच फायदा यिंगने आघाडी घेतली आणि ती वाढवतच नेली. 

दुसऱ्या गेमच्या सुरवातीस सिंधूचे शॉटस्‌ प्रभावी होते; पण तिला लाईन व शटलच्या ड्रिफ्टचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे या गेममध्ये गुणफलक ४-४, ७-७ असा सरकत होता. याचवेळी सिंधू काहीशी बहरली आणि तिने १०-७ आघाडी घेतली. ब्रेकनंतर यिंग प्रभावी ठरली. त्यातच तिने व्हिडीओ रेफरल गमावला आणि ती ११-१२ मागे पडली. ती १२-१३ मागे असताना सिंधूला व्हिडिओ रेफरल नाकारला गेला. त्यानंतर सिंधूच्या खेळाची लयच  हरपली. 

१२-१८ पिछाडीनंतर सिंधूचा प्रतिकार तोकडा पडला. तिने दोन मॅच पॉईंट वाचवले खरे; पण निकाल बदलला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com