यू मुम्बाचा निसटता विजय

शैलेश नागवेकर
सोमवार, 31 जुलै 2017

हैदराबाद - काशिलिंग आडकेची एक सुपर चढाई आणि उत्तरार्धात पकडींमध्ये केलेली काहीशी सुधारणा याच्या जोरावर यू मुम्बाने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात नवोदित हरियाना स्टीलर्सचा २९-२८ असा पराभव केला. 

प्रो कबड्डीचे माजी विजेते असलेल्या यू मुम्बाचा बचाव यंदा कमकुवत वाटत आहे. याचाच फटका त्यांना पुण्याविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात बसला होता. त्यानंतर कर्णधार अनुप कुमारने याची खंतही व्यक्त केली होती. आज यामध्ये सुधारणा झाली; परंतु तीही पुरेशी नव्हती, असे त्याने सांगितले. त्यातच हरियानाकडून सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर असे दोन कॉर्नर असल्यामुळे चढायांमध्येही गुण मिळवता येत नव्हते.

पूर्वार्धात लोण स्वीकारल्यामुळे मुंबईचा संघ ११-१५ असे पिछाडीवर पडला होता. मुंबईला मध्यंतरापूर्वी पकडींचे केवळ दोनच गुण मिळवता आले होते. उत्तरार्धात १५-१९ अशी पिछाडी असताना काशिलिंगने डू ऑर डाय चढाई करत सुपर चढाई केली आणि पिछाडी १८-१९ केली. तेथूनच सामना मुंबईच्या बाजूने झुकला होता. मुंबईनेही हरियानाला लोण दिला आणि २५-२२ अशी आघाडी घेतली होती; परंतु सामना अंतिम टप्प्यात आला असताना कमालीची चुरस वाढली. २९-२६ अशी आघाडी असताना मुंबईला एका गुणाच्या जोरावर मिळालेल्या विजयावर समाधान मानावे लागले.

बंगळूरची सरशी
नव्या मोसमाची धडाक्‍यात सुरवात करणाऱ्या तेलगू टायटन्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. आज रोहित कुमारच्या खोलवर चढायांनी त्यांच्या बचावाची परीक्षा बघितली. बंगळूरने सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी करत ३१-२१ असा विजय मिळवला. रोहितच्या चढायांसमोर तेलगू निष्प्रभ ठरले; तसेच राहुल चौधरी हा त्यांचा हुकमी चढाईपटू अपयशी ठरला आणि हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले.