तमीळ थलैवाजची ‘अजय’ कामगिरी

संजय घारपुरे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - पहिल्या सत्रात केवळ एकच गुण घेतलेल्या अजय ठाकूरने शेवटच्या चढाईत दोघांना बाद करीत तमीळ थलैवाजला प्रो-कबड्डी स्पर्धेत बंगाल वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवून दिला. या विजयामुळे घरच्या मैदानावरील टप्पा सुरू होण्यापूर्वी गटात तळास असलेल्या तमीळने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या.

नवी दिल्ली - पहिल्या सत्रात केवळ एकच गुण घेतलेल्या अजय ठाकूरने शेवटच्या चढाईत दोघांना बाद करीत तमीळ थलैवाजला प्रो-कबड्डी स्पर्धेत बंगाल वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवून दिला. या विजयामुळे घरच्या मैदानावरील टप्पा सुरू होण्यापूर्वी गटात तळास असलेल्या तमीळने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या.

त्यागराज स्टेडियमवर अजय ठाकूर अपयशी ठरणार, असे वाटत असतानाच त्याला सूर गवसला. त्याने त्याच्या सामन्यातील अखेरच्या सात मिनिटांत आठ चढायांत आठ गुण घेत संघाला विजयी केले. अजयचा हा धडाका सुरू होण्यापूर्वी तमीळ दोन गुणांनी मागे होते आणि त्यांनी ३३-३२ असा विजय मिळविला. खरं तर हेच काहीसे चित्र बंगालचा आघाडीचा बचावपटू सुरजित सिंगबाबत होते. बंगालला पूर्वार्धात पकडीचे दोनच गुण होते, पण त्याने उत्तरार्धात त्याच्या कसोशीच्या प्रयत्नामुळे बंगालने पकडीत पाच गुण मिळवत तमीळला चांगलाच प्रतिकार सुरू केला होता. मात्र अखेर या दोन स्टारच्या लढाईत अजय सरस ठरला आणि बंगालचा वेगाने प्रगती केलेला सुपर टेन आक्रमक मनिंदर सिंगने तेरा गुण घेऊनही विजय बंगालकडून निसटलाच. 

या लढतीचा पूर्वार्ध काहीसा वेगळाच होता. पकडीत सरस ठरलेल्या तमिळने लोण दिला होता, तसेच विश्रांतीसही आघाडी होती. चढाईतील ६-११ पिछाडी त्यांनी पकडीत ९-२ अशी एकतर्फी हुकूमत राखत विश्रांतीस १८-१५ अशी तीन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र अजय ठाकूरला चढाईत मिळालेला एकच गुण तमीळच्या वर्चस्वावर मर्यादा आणत होत्या. मात्र त्याचे अपयश सी. अरुण, जे. दर्शन आणि संकेत चव्हाण भरून काढत होते. ही पूर्वार्धातील आघाडी आणि अजय ठाकूरने केलेला प्रतिकार तमीळला विजयाकडे घेऊन गेले. 

दिल्ली अधिकच गाळात
पराभवाच्या खाईतून घरच्या कोर्टवरही बाहेर पडण्यास दिल्ली तयार नाही. त्यांना हरियाणा स्टीलर्सने कमालीच्या एकतर्फी लढतीत ४२-२४ असे सहज हरवले. हरियाणाने चढाईपेक्षा (१५) पकडीत (१८) घेतलेले जास्त गुण हे त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. तीन लोण करीत हरियानाने विजय एकतर्फी केला.

Web Title: sports news pro kabaddi