लखनौमध्येही घुमला गुजरातचा आवाज

शैलेश नागवेकर
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

लखनौ - घरच्या मैदानावर अपराजित राहण्याचा पराक्रम करणाऱ्या गुजरातने प्रो कबड्डीतील आपला आवाज लखनौमध्येही घुमवला. त्यांनी आपल्या एवढेच ताकदवान असलेल्या पुण्याचा ३५-२१ असा पराभव केला.
फझल अत्राचली आणि अबोझर या इराणी खेळाडूंची बचावाची तगडी भिंत, तसेच सचिन आणि सुकेश हेगडे यांच्या चढायांचा चक्रव्यूह पुण्याला भेदता आला नाही. गुजरात एवढाच पुण्याचाही संघ समतोल आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी गतविजेत्या पाटणाला पराभूत करण्याची किमया केली. आज मात्र त्यांची गाडी रुळावरून घसरली.

गुजरातच्या सचिनने बोनस गुण मिळवला. त्यानंतर फझलने पुण्याच्या दीपक हुडाची पकड केली. हीच झटापट सामन्याची दिशा ठरवणारी ठरली. सातव्या मिनिटाला पुण्याने सचिनची पकड केली आणि ५-५ अशी बरोबरी साधली. तेव्हा सामना अटीतटीचा होईल, असे वाटत होते; परंतु त्यानंतर पुढचा गुण मिळवण्यासाठी पुण्याला दहा मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान गुजरातने लोण देत मध्यांतराला १६-७ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात पुण्याचा कर्णधार दीपक हुडाच्या दोन पकडी झाल्या. तेथे पुन्हा एकदा त्यांचे आक्रमण कमजोर झाले. तरीही पिछाडी १८-२४ अशी कमी करण्यात त्यांनी यश मिळवले. एका सुपर टॅकलच्या दोन गुणांमुळे हुडाला अखेरची दोन मिनिटे असताना जीवदान मिळाले; परंतु लगेचच त्याची पकड झाली. अखेरच्या काही मिनिटांत गुजरातने खेळ संथ केल्यानंतरही अखेरच्या मिनिटाला त्यांना पुण्यावर लोण देण्याची संधी मिळाली. राजेश मोंडलचे अपयश पुणे संघाला नक्कीच महागात पडले.

यूपीचा पराभव
घरच्या मैदानावर यूपी योद्धाचे पराभवाचे दुष्टचक्र संपलेले नाही. बंगालकडूही पराभूत झाल्यामुळे त्यांनी सलग चौथा सामना गमावला आहे. तीन पराभवानंतर आज त्यांनी आपला खेळ उंचावला होता. मात्र, आपल्या आक्रस्ताळेपणावर त्यांना नियंत्रण न ठेवता आल्याने त्यांना तीन गुणांचा दंड बसला आणि हाच निर्णायक ठरला. त्यांना अखेरीस ३१-३२ असा पराभव पत्करावा लागला.

Web Title: sports news pro-kabaddi competition