प्रो-कबड्डीत हरियाना स्टिलर्सचा दिल्ली दबंगविरुद्ध चुरशीचा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

लखनौ - प्रो-कबड्डी स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सूर गवसल्यानंतरही दिल्ली दबंग संघाला हरियाना स्टिलर्स संघाकडून २७-२५ असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात घरच्या मैदानावर उत्तर प्रदेश योद्धाज संघाला तमिळ थलैवाज संघाने ३३-३३ असे बरोबरीत रोखले. अबोफझल, मेराझ शेख यांच्या चढायांना निलेश शिंदेच्या पकडींची सुरेख साथ मिळाली होती. मात्र, दीपककुमार दहिया आणि सुरजितसिंगच्या खोलवर चढाया हरियानासाठी निर्णायक ठरल्या. रिशांक देवाडिगा आणि अजय ठाकूर या चढाईपटूंमध्येच रंगलेल्या सामन्यात उत्तर प्रदेश योद्धा संघाला घरच्या मैदानावर पराभव वाचवल्याचे समाधान लाभले.

लखनौ - प्रो-कबड्डी स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सूर गवसल्यानंतरही दिल्ली दबंग संघाला हरियाना स्टिलर्स संघाकडून २७-२५ असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात घरच्या मैदानावर उत्तर प्रदेश योद्धाज संघाला तमिळ थलैवाज संघाने ३३-३३ असे बरोबरीत रोखले. अबोफझल, मेराझ शेख यांच्या चढायांना निलेश शिंदेच्या पकडींची सुरेख साथ मिळाली होती. मात्र, दीपककुमार दहिया आणि सुरजितसिंगच्या खोलवर चढाया हरियानासाठी निर्णायक ठरल्या. रिशांक देवाडिगा आणि अजय ठाकूर या चढाईपटूंमध्येच रंगलेल्या सामन्यात उत्तर प्रदेश योद्धा संघाला घरच्या मैदानावर पराभव वाचवल्याचे समाधान लाभले. बचावाच्या आघाडीवर उत्तर प्रदेश कमी पडले.

त्याच आघाडीवर तमिळ थलैवासकडून अमित हुडाने भक्कम बचाव करत संघाचे आव्हान राखण्यात मोलाचा वाटा उचलला. रिशांकने २१ चढायांत १४ गुण मिळविले, तर अजयने २४ चढायांत १० गुण नोंदवले.

Web Title: sports news pro-kabaddi competition