यूपी योद्धाजचा तेलुगूवर विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

लखनौ - घरच्या मैदानावर सूर गवसलेल्या उत्तर प्रदेश योद्धाज संघाने गुरुवारी तेलुगू टायटन्सवर २५-२३ असा विजय मिळविला. प्रो-कबड्डीचा पुढील टप्पा उद्यापासून मुंबईत सुरू होईल. कर्णधार नितीन तोमरच्या चढाया आणि बचावात नीतेश कुमारने दिलेल्या साथीमुळे उत्तर प्रदेशचे आव्हान कायम राहिले. गेल्या दोन सामन्यांत सातत्याने गुण कमाविणाऱ्या रिशांकला आज छाप पाडता आली नाही. तीच स्थिती तेलुगूच्या राहुल चौधरीची होती.

एकामागून एक सारख्या अशा २३ चढाया केल्यानंतरही त्याला केवळ चार गुण नोंदवता आले. तेलुगूने बचावात (१०-१२) उत्तर प्रदेशपेक्षा दोन गुण अधिक कमावले. चढाईच्या आघाडीवर मात्र उत्तर प्रदेशने (१३-१०) तेलुगूला दिलेली मातच निर्णायक ठरली.