अर्धशतकी गुणांसह मुंबईचा शानदार विजय

संजय घारपुरे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

सोनीपत - डुबकी मास्टर प्रदीप नरवालचे कौशल्य आणि हुशारीने खेळणारा अनुपकुमार यांच्यातील चकमकीने यू मुम्बा आणि पाटणा पायरेट्‌स यांच्यातील प्रो कबड्डीची लढत रंगली आणि त्यात अखेर कमालीचे सर्वोत्तम सांघिक खेळ केलेल्या मुंबईने ५१-४१ असा सहज विजय मिळविला. 

कबड्डी खेळाडूंची खाण असलेल्या सोनीपतवासी प्रदीप नरवालला रोखल्यासच आपण जिंकू शकतो, याची मुंबई कर्णधार अनुपकुमारला कल्पना होती.

त्यासाठी त्याने प्रदीपच्या चढाईच्या वेळी उजवा कोपरारक्षक होण्याचे ठरवले. अन्य चढायांच्या वेळी प्रसंगी डावा कोपरारक्षक, तर प्रसंगी मधल्या साखळीत स्वतःला ठेवले. त्याची ही चार पूर्वार्धात चांगलीच यशस्वी ठरली. त्यामुळे मुंबईला पाटणाविरुद्ध दोन लोण देता आले होते. आता पाटणाने उत्तरार्धात चांगला प्रतिकार केला. अनुपची एकच यशस्वी पकड झाली, तर त्याच्या पाच पकडी विफल ठरल्या होत्या; पण प्रदीपला गुणांचा धडाका मिळण्यापासून नक्कीच रोखले. काशिलींग आडके तसेच श्रीकांत जाधवची सुपर टेन कामगिरी दर्शन काडियनच्या उपयुक्त चढायांनी मुंबईला कायम आघाडीवर ठेवले. 

Web Title: sports news pro kabaddi competition