तेलुगू टायटन्सची पायावर कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सोनीपत - अखेरची सहा मिनिटे शिल्लक असताना असलेल्या २०-३० अशा मोठ्या आघाडीनंतरही विनाकारण बचावात्मक राहण्याची चूक तेलुगू टायटन्सला चांगलीच महागात पडली. प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात मंगळवारी झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने मुसंडी मारत अखेरच्या चढाईला तेलुगू संघावर ३२-३१ असा विजय मिळविला. 

सामन्याच्या पूर्वार्धात फारसे काही घडले नाही. सामन्यात तसा जोश नव्हता. राहुल चौधरी हे चढाईतील तेलुगूचे मुख्य अस्र चालत नव्हते. त्याची उणीव नीलेश साळुंके भरून काढत होता. दुसरीकडे बंगालसाठी मनिंदरला लय गवसत नव्हती. पण, जांग कुन लीच्या चढाया गुण वसूल करत होत्या.

तेलुगूला तिसऱ्या चढाईच्या कोंडीत पकडत बंगालने पूर्वार्धात तेलुगूला आव्हान दिले. मात्र, तेलुगूने चढायातील अपयश बचावात पुसून काढत लोण दिला आणि विश्रांतीला चढाई आणि पकडीच्या एकूण गुणांत मागे राहूनही १३-१५ अशी आघाडी मिळवली होती. 

उत्तरार्धात हीच स्थिती कायम होती. अर्थात गुणांचा फरक तेलुगूने चार गुणांपर्यंत वाढवला होता. अखेरची सहा मिनिटे शिल्लक असताना नीलेश साळुंकेची पाठीमागून पकड करण्याच्या नादात बंगालने पाच खेळाडूंमध्ये चार गुण गमावले आणि तेलुगूने बंगालवर दुसरा लोण देत ३०-२० अशी मोठी आघाडी मिळवली. ही आघाडी टिकविण्याच्या नादात तेलुगूच्या प्रशिक्षकांनी बाहेरून बचावात्मक खेळण्याच्या सूचना केल्या आणि त्याच त्यांच्या आंगलट आल्या. अखेरच्या चार मिनिटांत मनिंदरच्या ताकदवान चढाया निर्णायक ठरल्या. जांग कुन ली यानेही आपला वाटा उचलताना चढायात एकूण नऊ गुण मिळविले. दहा गुणांच्या पिछाडीनंतरही बंगालने तेलुगूला एकही गुण मिळवू न देता उलट त्यांच्यावर लोण देत ३१-३० अशी आघाडी मिळवली. अखेरच्या मिनिटात तेलुगूने एक गुण मिळवून बरोबरी साधली. पण, उर्वरित काही सेकंदाच्या खेळात  जांग कुन लीने शिताफीने चढाई करत एक टच पॉइंट वसूल करत बंगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हरियानाचा दिल्लीवर विजय 
हरियानाने आपली आगेकूच कायम ठेवताना दिल्लीचा २७-२४ असा पराभव केला.