सॉफ्टबॉल स्पर्धेत भुजबळ विद्यालय अव्वल

नागनाथ शिंगाडे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे): तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण  संभाजीराव भुजबळ विद्यालयाने १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विभागीय पातळीवरील सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळविले असून, या संघाची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे): तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण  संभाजीराव भुजबळ विद्यालयाने १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विभागीय पातळीवरील सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळविले असून, या संघाची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.

जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्यातर्फे गुरूवारी (ता. ५) विभागीय स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले होते. सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत अहमदनगर, सोलापूर व पुणे (शहर व ग्रामिण)आणि पिंपरी चिंचवड या सात संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पुणे ग्रामिण संघाकडून संभाजीराव भुजबळ विद्यालयाने प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात भुजबळ विद्यालयाने सोलापूर शहर संघाचा दोन होमरनांने पराभव केला.

अंतिम सामना पुणे शहर विरूद्ध पुणे ग्रामिण यांच्यामध्ये अतिशय रोहर्षक व अटीतटीचा झाला. या सामन्यात पुणे ग्रामिण संघाकडून संभाजीराव भुजबळ विद्यालयाने एक होमरनने विजय संपादन करून राज्यपातळीवरील स्पर्धेत प्रवेश मिळविला. या संघातील सर्व खेळाडूंना शासकीय सवलती, दहावी व बारावीच्या परीक्षेत ग्रेस गुणांचा लाभ मिळणार आहे.

भुजबळ विद्यालयाच्या संघात काजल देंडगे (कर्णधार), दिव्या भुजबळ, प्रणाली भुजबळ, सुलभा भुजबळ, पुजा झेंडे, पूनम मारणे, साक्षी शिंदे, निकीत पवार, अक्षदा मोरे, प्रतिक्षा वडघुले, कोमल वडघुले, स्नेहा साळुंके, रूचा भुजबळ, तेजश्री घाडगे, हर्षदा भुजबळ, सुनिता काळे या खेळाडूंनी भाग घेवून विशेष कामगिरी केली. विजेत्या संघाला प्रा. किरण झुरंगे, ज्ञानेश्वर शितोळे, शालन खेडकर, राजेंद्र हंबीर यांनी खेळाचे मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूंचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीरव भुजबळ, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र भुजबळ यांनी विशेष अभिनंदन केले असून, राज्य पातळीवरील खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.