आठ तासांची पेनल्टी बसूनही संजय तिसरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पुणे -  संजय टकले याने आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील होक्कायडो रॅलीत आठ तासांची पेनल्टी बसूनही आशिया करंडक गटात तिसरा क्रमांक मिळविला. एकुण क्रमवारीत तो पंधरावा आला. तिसऱ्या स्टेजमध्ये  संजयसह तब्बल सहा जणांना माघार घ्यावी लागली.

संजयच्या कारचे आधी मागील डावे व मग उजवे चाक पंक्‍चर झाले. स्टेपनी एकच असल्यामुळे त्याला माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने नव्या उत्साहात सुपर रॅलीत भाग घेतला. स्टेजगणिक त्याने समाधानकारक वेग राखला. ओटोफुके रिव्हर्स एक स्टेजला १७वा, न्यू होनबेत्सूला १३वा, न्यू ओशोरो लाँग एकला १२वा, ओटोफुके रिव्हर्स दोनला १५वा, न्यू होनबेत्सू दोनला १२वा अशी त्याची कामगिरी झाली. सॅमो सात्सुनाई या सुपर स्पेशल स्टेजमध्ये त्याने सातव्या क्रमांकावर झेप घेत टॉप टेन फिनीश नोंदविला.